'यिनने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवली'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई - महाविद्यालयीन तरुणांना नेतृत्व करण्याची संधी यिनने दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यात यिनला यश आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील यिनच्या मंत्री आणि आमदारांनी सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाचे (आरोग्य निधी) विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी सोमवारी येथे महाविद्यालयीन तरुणांना दिला. तसेच येणाऱ्या काळातही यिनसोबतचा जिव्हाळा कायम राहील, असेही ते म्हणाले.

यिनच्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसोबत काम करत असताना आलेले अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. विविध आजारांच्या उपचाराकरिता सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राज्यभरातून दररोज २५० ते ३०० नागरिक येत असतात. यातील काही नागरिकांकडे तिकीट काढण्याइतकेही पैसे नसतात. हे रुग्ण आनंदाने पुन्हा परतावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच रोगाने पछाडलेल्या व्यक्तीला जात, धर्म, पंथ असे काहीही नसते, असेही शेट्टी या वेळी म्हणाले. उपचारासाठी पैसे मिळावेत, यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात देव दिसतो. त्यामुळे देवळात जाण्याची आवश्‍यकता वाटत नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. राज्यातील गरजू व्यक्तीला आरोग्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्याकरिता मी सदैव तुमच्या संपर्कात राहीन, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना आरोग्यावर खर्च करण्यासाठी जमीन गहाण ठेवावी लागते. काही शेतकरी काळी आई गहाण ठेवतात; तर काही शेतकरी विक्री करतात. हे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांना आत्महत्येकडे घेऊन गेले, असे या वेळी शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Yin has patriotism in students