
मुंबई - दुचाकीवरून मुंबई-लंडन-मुंबई असा प्रवास करणारा योगेश अलेकरी १३६ दिवसांत मुंबईत परतला आहे. एकट्याने दुचाकी चालवून लंडनचा परतीचा प्रवास पूर्ण करणारा योगेश पहिला भारतीय ठरला आहे. योगेशने २७ देश, आशिया आणि युरोप या खंडातून प्रवास करून विक्रम केला आहे. यादरम्यान सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा आणि वसुधैव कुटुंबकम या दोन महत्वपूर्ण संदेशाचा जगभरात प्रसार करण्याचे काम योगेशने केले आहे.
योगेश अलेकरी याने मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून मुंबई ते लंडन प्रवासाला २७ जुलै रोजी सुरुवात केली. तर १६ सप्टेंबर रोजी लंडन गाठले. लंडन येथील भारतीय दूतावासाला भेट दिली. यू.के.मधील वेल्समधील हे-ऑन-वाय हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला सुद्धा योगेशने भेट दिली.
शिवाय, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’ हे काव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लिहिले. या समुद्र किनाऱ्याला भेट दिली. या प्रत्येक ठिकाणी जाऊन रस्ते सुरक्षेविषयी जागृती केली, असे योगेशने सांगितले.
१६ ते २९ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक ठिकाणाला भेटी दिल्या. हमास-इस्राईल युद्धामुळे परतीच्या मार्गात काही अडथळे आल्याने मार्गात बदल केला. तसेच पाकिस्तानमधून व्हिसा मिळाला नसल्याने, दुबईवरून विमानाने कोचीन येथे प्रवास करत कोचीन वरून रस्ते मार्गाने कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, कराड असा प्रवास करून १७ डिसेंबर रोजी मुंबईत पोहचल्याचे योगेशने त्याचा प्रवास सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.