दुचाकीच्या हट्टापायी मुलाने पेटवून घेतले 

दुचाकीच्या हट्टापायी मुलाने पेटवून घेतले 

पनवेल : वडिलांनी शाळेत जाण्यासाठी दुचाकी न दिल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना कळंबोली येथे घडली. शिवम दीपक यादव (वय 17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचार सुरू आहेत. 

कळंबोलीच्या अमरदीप सोसायटी येथील रहिवासी असलेले दीपक यादव मुंबई पोलिस दलात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा शिवम हा कळंबोलीतील न्यू सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. दीपक यादव यांनी काही महिन्यांपूर्वी दुचाकी घेतली होती. ही दुचाकी शिवमदेखील चालवत होता. मात्र, शिवमचे वय 17 वर्षे असल्याने त्याने आतापासून दुचाकी चालवू नये, असे त्याचे वडील त्याला सांगत होते. मात्र, तरीही शिवम वडिलांकडे दुचाकी चालविण्याचा हट्ट धरत होता. त्यामुळे दीपक यादव यांनी रागाच्या भरात त्यांची दुचाकी विकून टाकण्याचाही इशारा शिवमला दिला होता. 

दरम्यान, शुक्रवारी (ता.15) सकाळी शिवमने महाविद्यालयात जाण्यासाठी वडिलांकडे दुचाकी मागितली; मात्र दीपक यादव यांनी त्याला दुचाकी देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवम रागाच्या भरात रॉकेल घेऊन महाविद्यालयात गेला. वर्गात न जाता तो महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. आरडाओरड करत पेटलेला शिवम शौचालयातून बाहेर आला. या वेळी शिक्षकांनी आग विझवून तातडीने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेत शिवम 90 टक्के जळाल्याने त्याला ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटर येथे हलवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. 

web title : young boy burned himself for two wheeler

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com