Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaEsakal

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलेल्या तरूणीला दरदरून फुटला घाम अन्...

लालबागच्या राज्याच्या मंडपात दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे
Published on

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे. अशातच पुणे, मुंबई या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहे. अशातच दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमध्ये मोठी गर्दी झाली आहे.(Latest Marathi News)

दरम्यान, लालबागच्या राज्याच्या मंडपात एकाच वेळी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे एका तरुणीला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला घाम फुटला आणि तिची प्रकृती बिघडली. (Marathi Tajya Batmya)

Lalbaugcha Raja
Nagpur Floods: फक्त १ तासाचा पाऊस अन् होत्याचं नव्हतं झालं...नाग'पूर' जलप्रलय पाहा photo

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ झाला. तरुणी खाली कोसळताच रांगेत उभ्या असलेल्या इतर भाविकांनी तिची मदत केली. काही भाविकांनी तिला बाजूला बसवलं. तर तिच्या तोंडावर पाणी मारलं.

दर्शनासाठी आलेल्या या मोठ्या गर्दीत या तरुणीवर तात्काळ उपचार करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणी शुद्धीत आली. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.(Latest Maharashtra News)

Lalbaugcha Raja
Pitbull Attack: शाळेत निघालेल्या चिमुकलीवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला! 22 ठिकाणी घेतला चावा; ICUमध्ये दाखल

गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस आहे. लालबागचा राजा मंडप परिसरातील गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गर्दी इतकी प्रचंड आहे. भाविकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com