मुंबईत लोकलच्या प्रवासासाठी बनावट QR कोड बनवणारा गजाआड

पूजा विचारे
Thursday, 1 October 2020

कोरोनाच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या काळात प्रवासांचे खोटे QR कोड देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पदार्फाश केला आहे. 

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या काळात रेल्वेनं अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी क्यू आर कोडची पद्धत सुरु केली. मात्र या काळात प्रवासांचे खोटे QR कोड देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पदार्फाश केला आहे. 

रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा आरोपी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून द्यायचा. एवढंच काय तर ज्या प्रवाशांना खोटे क्यूआर कोड पास बनवून दिले आहेत त्यांना देखील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या तरुणानं या प्रवाशांना खोटे क्यू आर कोड तयार करून दिले आहेत. अनिस राठोड असं या आरोपीचं नाव आहे.  मुंबई रेल्वे पोलिसांच्या टीमनं या आरोपीला अटक केली. आरोपी अनिस राठोड मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरातील रहिवासी आहे. अनिल हा अॅन्टॉप हिल येथूनच लोकांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देत होता. लोकांना लोकलनं प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड तयार करून देण्याचं काम तो या भागातूनच करत होता. हे क्यू आर कोड तयार करून देण्याच्या बदल्यात जवळपास 500 ते 1000 रुपये घेत होता. 

अधिक वाचाः  ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या, ऐरोली घणसोली स्थानकात थांबाच नाही
 

ज्यावेळी वडाळा GRP ने वडाळा स्टेशन वरून दोघांना खोटे क्यू आर पास असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं. त्यावेळेस हा सर्व प्रकार उघडकीस आला. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून अनिस राठोडचं नाव समोर आले. या दोघांनी अनिसकडूनच खोटे क्यूआर कोड बनवून घेतले होते.

वडाळा पोलिसांनी अनिस राठोडला गाठलं आणि त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्यासह घरातील साहित्य ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या घरातून कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त केले आणि त्याला अटक केली. ज्या लोकांना त्याने क्यू आर कोड तयार करून दिला ते सगळे छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार आहेत. अनिस राठोडने आतापर्यंत 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले असल्याची कबुली दिली आहे.

अधिक वाचाः  बेस्टच्या मदतीला धावणार ST, नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत 1 हजार बसेस धावणार

अनिस राठोडवर इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस या सर्वांचा तपास करत माहिती गोळा करत आहेत. अनिसकडून पास बनवणाऱ्यांमध्ये मस्जिद बंदर येथे काम करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं अनिसकडून पोलिसांना सांगण्यात आलं आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक हावळे आणि चव्हाण, पोलिस हवालदार प्रवीण एवळे, सागर रणवारे, पोलिस शिपाई तुषार कवठेकर सागर गायकवाड या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

Young man arrested creating fake mumbai local QR code non essential service wadala police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man arrested creating fake mumbai local QR code non essential service wadala police