पाचशे रुपयांसाठी केला ब्लेडने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

कोणतीही वस्तू खरेदीसाठी गेलोकी आपण अनेकदा बार्गेनिंग करत असतो.

ठाणे : खरेदी म्हटलं की सामान्यांच्या मनात येणारा एक विचार म्हणजे बार्गेनिंग..कोणतीही वस्तू खरेदीसाठी गेलोकी आपण अनेकदा बार्गेनिंग करत असतो. कधी कधी आपल्या मनासारखी बार्गेनिंग होते किंवा कधी कधी होत नाही. जेव्हा असे होत नाही तेव्हा मग आपली चिडचिड होते अनेकदा दुकानदाराशी वाद देखील होतात. पण अशाच  वादात एका तरुणाने चक्क समोरच्या व्यक्तीवर ब्लेडने वार करत जीवघेणा हल्ला केला आहे.

हेही वाचा - ब्रेकअपनंतर बर्गर फ्रि... वाचा काय आहे गुड न्यूज

जुना फ्रीज विक्रीसाठी आलेल्या ठाण्यातील तरुणाने आगाऊ 500 रुपये देण्यास नकार देणाऱ्या भंगारविक्रेत्यावर ब्लेडने जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी आरोपी राकेश गुप्ता या तरुणाला दोषी ठरवीत ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दोन वर्षे तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडापैकी 40 हजारांची रक्कम तक्रारदार जखमीला देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी काम पाहिले.

महत्त्वाची बातमी - 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे 

वागळे इस्टेट, रस्ता क्र. 28 रामनगरमध्ये जगत आर्या (35) याचा भंगार विक्रीचा धंदा आहे. 20 मार्च 2015 ला याच परिसरात राहणाऱ्या राकेश गुप्ता याने त्याच्या घरातील जुना फ्रीज विकण्याचे सांगून भंगारविक्रेता जगत आर्या यांच्या दुकानात येऊन आगाऊ 500 रुपये मागितले. जगत यांनी नकार दिल्याने त्याचा राग मनात राग धरून राकेशने जगतवर ब्लेडने वार केले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून राकेश याला अटक केली होती. 

web title : Young man Attack shopkeeper with the blade 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man Attack shopkeeper with the blade