आधी प्रेयसीला मारहाण, नंतर २ वर्षांच्या चिमुरड्यालाही चावा; प्रेमसंबंधातील वादातून संतापजनक कृत्य, मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार

Mumbra Crime News: मुंब्रा येथे प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीला मारहाण केल्यानंतर तिच्या दोन वर्षांच्या मुलालाही चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbra Crime

Mumbra Crime

ESakal

Updated on: 

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे रूपांतर दोन वर्षांच्या चिमुरड्याला मारहाण करण्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार मुंब्रा येथे नुकताच उघडकीस आला. प्रियकराने प्रेयसीला मारहाण केल्यानंतर तिच्या दोन वर्षांच्या मुलाला गालावर, हातापायावर चावून दुखापत केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर महिलेने प्रियकराविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...