पेटत्या फटाक्‍यामुळे युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - वडाळा येथे मिरवणुकीत फटाके फोडताना घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. अफजल फकरुद्दीन खान (वय 17) असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेत मोईन असरुद्दीन शेख हा जखमी झाला आहे. त्याच्यावर शीव येथील टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऍण्टॉप हिल पोलिसांनी अफजलच्या नातेवाइकांचा जबाब नोंदवला आहे.

अफजल आणि मोईन वडाळ्यातील संगमनगर परिसरात राहतात. रविवारी (ता. 20) सायंकाळी संदलची मिरवणूक निघाली होती. संगमनगर येथून निघालेल्या संदलमध्ये अफजल हा सुतळी बॉंब फोडत होता. अफजलने एका लोखंडी पाइपमध्ये सुतळी बॉंब ठेवून पेटवला. हा बॉंब थेट अफजलच्या अंगावरच उडाला. यात अफजल आणि मोईन जखमी झाले. जखमींना शीव येथील टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने अफजलचा मृत्यू झाला, तर मोईनच्या डोक्‍याला इजा झाल्याचे ऍण्टॉप हिल पोलिसांनी सांगितले.

Web Title: The young man death by cracker

टॅग्स