अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई-पुणे रस्त्यावरील पारसिक नगर परिसरातील सफायर रुग्णालयाजवळ एका १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी (ता. ८) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली.

कळवा : मुंबई-पुणे रस्त्यावरील पारसिक नगर परिसरातील सफायर रुग्णालयाजवळ एका १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी (ता. ८) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास कळवा पूर्व भास्कर नगर येथील हरेराम हरेकृष्ण चाळीत राहणाऱ्या प्रिन्स शकलदेव यादव (१९) हा आपले काम आटपून घरी जाताना रस्ता ओलांडत जात असताना पारसिक नगर येथील सफायर रुग्णालयाजवळ एका अज्ञात वाहनाने प्रिन्सला जोराची धडक दिली. या धडकेत प्रिन्सच्या दोन्ही पायाला व डोक्‍यावर गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात कळवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in collision with unknown vehicle