कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

बेलापूरमध्ये राहणाऱ्या अरुण नलावडे (३०) या विवाहित तरुणाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोलीतील बिमा चौकात उभ्या असलेल्या टेम्पोच्या आतमध्ये गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

नवी मुंबई : बेलापूरमध्ये राहणाऱ्या अरुण नलावडे (३०) या विवाहित तरुणाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोलीतील बिमा चौकात उभ्या असलेल्या टेम्पोच्या आतमध्ये गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. मागील २५ ऑक्‍टोबर रोजी घरातून निघून गेलेला अरुण मंगळवारी सायंकाळी टेम्पोच्या आतमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 
बेलापूर येथे अरुण नलावडे हा पत्नी व दोन मुलांसह राहण्यास होता. तो टेम्पोचालक म्हणून काम करत होता. अरुणला दारूचे व्यसन जडल्याने तो आपल्या घरच्यांशी भांडण करून निघून जात होता. २५ ऑक्‍टोबरला तो घरच्यांशी भांडण करून निघून गेला होता. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी आला नव्हता. मंगळवारी सायंकाळी कळंबोलीतील बिमा चौकात उभ्या असलेल्या टेम्पोतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर, टेम्पो थांब्यावरील टेम्पोचालकांनी टेम्पो उघडून पाहिला असता त्यात अरुण नलावडे हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या खिशामध्ये सापडलेल्या कागदावर मोबाईल नंबर आढळून आल्याने पोलिसांनी या क्रमांकावर संपर्क साधला असता, हा मृतदेह अरुण नलावडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अरुण नलावडे याने कौटुंबिक वादातून टेम्पोच्या आतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिस पुढील तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young person suicide through family dispute