तुतूमैमै वरून अल्पवयीन विद्यार्थ्याने केला तरुणाचा खून; दोन जखमी

0murder_93.jpg
0murder_93.jpg

उल्हासनगर : पंधरवाडया पूर्वी झालेला किरकोळ वाद-तुतूमैमै वरून नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी चक्क एका तरुणाचा खून करून दोघांना जख्मी केल्याची घटना रविवारी रात्री उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून एक विद्यार्थी फरार झाला आहे.

खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल मिश्रा(20)आहे. तो आणि अल्पवयीन विद्यार्थी हे सिब्लॉक येथील दुनिचंद कलानी कॉलेजच्या परिसरात राहतात. पंधरा दिवशी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत विशालचा किरकोळ वाद तुतूमैमै वरून किंबहूना भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी विशालवर चाकूचा वार करून त्याला ठार मारले.

सनी झा,आकाश झा यांना जख्मी केले. याप्रकरणी मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे अविनाश काळदाते यांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश काळदाते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com