वांद्रे बसस्थानकाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे
वांद्रे बसस्थानकाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे

खड्ड्यांचा धोका : तरुणांचा मणका सरकतोय 

मुंबई : खड्ड्यांमुळे मुंबईतील दुचाकीस्वारांचा पाठीचा मणका सरकू लागला आहे. हेच खड्डे ज्येष्ठ नागरिकांची हाडे मोडत आहेत. मुंबईतील खासगी रुग्णालयात, पाठदुखी, कंबरदुखी आणि फॅक्‍चर झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा व्याधीचे आठवड्याला 8 ते 10 तरुण रुग्णालय गाठू लागले आहेत.

रस्त्यावर पाणी साचलेले असताना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यातच वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे चुकवणेही शक्‍य नाही. त्यामुळे अचानक खड्‌ड्‌यात दुचाकी गेल्यास कंबरेपासून मानेपर्यंत प्रचंड हादरा बसतो. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना स्लिपडिस्क आजार जडण्याची, म्हणजे पाठीच्या दोन मणक्‍यांमधील गादी निसटण्याची शक्‍यता असते, असे वर्सोवा येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या स्पाईन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी सांगितले. 

आठवड्याला आठ ते दहा रुग्ण पाठदुखीचे
पावसाळाच्या काळात अशा व्याधींचे साधारणत: 25 टक्के रुग्ण वाढतात. नानावटी रुग्णालयातील आर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश दोशी यांनी खड्ड्यांमुळे पाठीचा कण्याचा त्रास वाढला असल्याचे सांगितले. पावसाळ्यात खड्ड्यांच्या त्रासामुळे पाठदुखीची व्याधी घेऊन आठवड्याला आठ ते दहा रुग्ण येतात, असे ते म्हणाले. 

इतर वेळी खड्ड्यांमुळे असे त्रास होणारे रुग्ण अभावाने येतात. पावसाळ्यात खड्ड्याची खोली आणि आकार मुळात दुचाकीस्वार किंवा रिक्षाचालकांना समजत नाही. खड्ड्यातून रिक्षा गेली, की वृद्धांची हाडे खिळखिळी होतात. कित्येकदा फ्रॅक्‍चरही करावे लागते. दुचाकीस्वारांनाही डोक्‍याला वा छातीला मार लागतो, असेही डॉ. दोशी यांनी सांगितले. 

याकडे दुर्लक्ष नको 

  • पाठीच्या दुखण्यासह हातापायात मुंग्या येणे 
  • चालताना किंवा उभे राहताना त्रास होणे 
  • पाठीत सातत्याने झटके येणे 
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com