
मुंबई : राज्यात कोरोना संकटाने थैमान घातले असताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस दल आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य पार पाडत आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनाची बाधाही होत आहे. धारावी येथे कर्तृव्य बजावत असताना शाहूनगर पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरिक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलिसांच्या मृत्यूमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही गहिवरले असून त्यांनी एक भावूक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
ही बातमी वाचली का? लॉकडाऊनमध्येही मुंबईला चालतं-फिरतं ठेवणारे कोरोनाच्या विळख्यात!
दुर्दैवाने तो मजकूर खरा ठरला!
कोरोना विषाणूशी लढत असताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं. या वीर योध्द्याला धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अमोल कुलकर्णी यांच्या आठवणी सांगताना एरवी कर्तव्याच्या बाबतीत कातळापेक्षाही कठोर असलेले त्यांचे सर्व सहकारीही कसे भावूक झाले, हे मी पाहिलं.
या सहका-यांना धीर देत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे आहोत, याची ग्वाही दिली. मान्य आहे, की आज प्रसंग कठीण आहे. आज सगळे पोलिस कशा परिस्थितीत काम करत आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण विश्वास ठेवा, हेही दिवस लवकरच जातील. एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. अमोल कुलकर्णी यांनी मृत्यूच्या काही दिवस आधी फेसबुकवर शेअर केलेले एक छायाचित्र पहायला मिळाले. ते अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेले. 'कोणी पाच कोटी दिले तर कोणी 500 कोटी दिले, आम्ही मात्र आमचं आयुष्य देतोय', असं वाक्य त्यावर लिहिलेलं होतं. दुर्दैवाने त्या पोस्ट मधील हा मजकूर अमोल कुलकर्णी यांच्य बाबतीत तंतोतंत खरा ठरावा, हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल. काही का असेना पण हे सत्य पचायला खूप जड जातंय. या निमित्ताने मी सर्व पोलिसांना आश्वस्त करतो की तुमचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याची किंमत ही पैशात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या. काम करताना कशाचीही गरज पडल्यास आपल्या वरिष्ठांपर्यंत ती पोहोचवण्यास विसरू नका.
पोलिसांना अश्रू अनावर
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली आणि तिथल्या पोलिसांना धीर देत मनोबल वाढविले. त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सहकाऱ्याच्या निधानानंतर पोलीस निरीक्षकाला अश्रू अनावर झाल्याने त्यांना गृहमंत्र्यामोर रडू कोसळले. अनिल देखमुख यांनी पोलिस निरीक्षकाचे सांत्वन केले. पोलिसांना अश्रू अनावर झाल्याने सर्वत्र शांतता पसरली होती. गृहमंत्र्यांनी धीर देत शाहूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांचे मनोबल वाढविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.