इफेड्रीनसह तरुण अटकेत; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

दीपक शेलार
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ठाणे : इफेड्रीन या अमलीपदार्थासह एका तरुणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश कचरू कसबे (वय.30 रा.महात्मा फुले नगर) असे संबंधित तरुणाचे नाव असून, ठाणे अमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सहा लाख 22 हजार 600 रुपयांचा 155 ग्रॅम इफेड्रींन ड्रग्स जप्त करण्यात आला, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने यापूर्वी इफेड्रीन तस्करीचे मोठे रेकेट उद्धवस्त केले होते. तरीही पुन्हा इफेड्रीनची विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एक अज्ञात इसम ठाण्यातील गजबजलेल्या जांभळी नाका परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे अमलीपदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास जांभळी नाक्याकडून टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीआर वाडिया दवाखान्यासमोर सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 155 ग्रॅम इतका इफेड्रींन हा अमलीपदार्थ आढळून आला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Youth arrested with ephedrine in Thane