तलवारीसोबतचं 'सोशल फोटोसेशन' तरुणाला महागात

police
police

अंबरनाथ : तलवारीसह केलेलं सोशल फोटोसेशन अंबरनाथच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडल आहे. कारण या फोटोंमुळे त्याची रवानगी थेट पोलिस कोठडीत झाली आहे.

चंद्रकांत उर्फ चंदू मोटे असं या २८ वर्षीय तरुणाचं नाव असून तो अंबरनाथच्या खुंटवली भागात राहणारा आहे. एका मोठ्या सुपरमार्केट चेनमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणारा चंदू काही महिन्यांपूर्वी उत्तर भारतात पर्यटनासाठी गेला होता. यावेळी त्यानं तिथून हौसेपोटी एक तलवार विकत आणली आणि ती घरी ठेवली. मात्र इतक्यावरच न थांबता त्यानं ही तलवार हातात घेऊन अनेक फोटो काढले आणि ते फुसबुक अकाउंटवर टाकले. हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले आणि थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.

त्यामुळे पोलिसांनी या फोटोंची चौकशी करत चंदूला शोधून काढले आणि थेट गुन्हा दाखल करत अटक केली. त्याच्यावर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून ही तलवारही जप्त करण्यात आली आहे. केवळ अतिउत्साहीपणात केलेल्या सोशल फोटोसेशनमुळे आज चंदू पोलिस कोठडीत आहे. त्यामुळं तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जपून करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com