प्रेयसीवरील संशयावरून तरुणाला मारहाण 

प्रेयसीवरील संशयावरून तरुणाला मारहाण
प्रेयसीवरील संशयावरून तरुणाला मारहाण

मुंबई ः प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून २५ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

कमलेश शिंदे (२२) व प्रदीप गुप्ता (२२) अशी आरोपींची नावे असून ते अँटॉप हिल परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणातील बालकाची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अतुल पांडे (२५) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. त्याची २० वर्षीय तरुणीसोबत मैत्री होती. तिचे कमलेशसोबत प्रेमसंबंध होते. तिने अतुल मित्र असल्याचे सांगितले होते; पण कमलेशला दोघांवर संशय येऊ लागल्यामुळे त्याने २४ ऑगस्टला दूरध्वनी करून त्यांना धमकावले. सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ त्यांना भेटण्यास बोलावले. अतुल घटनास्थळी आला असता दोन मित्रांसोबत आलेल्या कमलेशने हॉकी स्टीक आणि पट्ट्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर टॅक्‍सीत बसवून नंतर त्याला परळ उड्डाणपुलाजवळ सोडण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com