जोगेश्‍वरीत युवकाची गळफासाने आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - जोगेश्‍वरीच्या यादवनगर परिसरातील युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 9) रात्री घडली. नीलेश अनिल गुप्ता (18) असे त्याचे नाव आहे. आंबोली पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे. 

यादवनगर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या नीलेशने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी रात्री घरात टीव्ही पाहत असलेल्या नीलेशला आईने "टीव्ही पाहण्याऐवजी पाणी भर', असे सांगितले. त्या रागातून त्याने आई व बहीण शेजारी गेल्यावर दरवाजा बंद करून आत्महत्या केली. काही वेळाने आलेल्या आईला घराच्या बंद दरवाजावर ठोकूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर नीलेशने गळफास घेतल्याचे दिसले. स्थानिकांनी रुग्णालयात नेल्यावर डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोहचलेल्या आंबोली पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह विच्छेदनाकरिता पाठवला. 

Web Title: youth committed suicide in jogeshwari

टॅग्स