युवक काँग्रेसकडून लोकसभेतील पराभवाचे चिंतन

युवक काँग्रेसकडून लोकसभेतील पराभवाचे चिंतन

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि एनयुएसआय कडून चिंतन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एनयुएसआय आणि युवक काँग्रेसचे युवक काँग्रेसचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मुंबईतील काँग्रेस भवनात खुली चर्चा आयोजित करून पराभवाबद्दल चिंतन आणि आगामी उपाययोजना यावर कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संघटन कुठे कमी पडले यावर आत्मपरीक्षणपर खुली चर्चा झाली. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना मांडू दिल्या. तरुणांकडून आलेल्या सूचना स्वतः तांबे यांनी लिहून घेत तात्काळ अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष खा. राहुलजी गांधी यांनी आपला राजीनामा मागे घेतला पाहिजे असा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे ठराव एकमताने यावेळी संमत करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच एनयुएसआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com