
मुंबई: गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या बेस्ट बसला जोरदार धडक दिली. ज्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.