उल्हासनगर : उल्हासनगरात देवी विसर्जनाच्या सोहळ्यातील उत्सवी जल्लोष क्षणातच हिंसक वळणावर गेला. कॅम्प क्र. २ मधील रमाबाई टेकडी परिसरात जय अंबिका तरुण मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्याने वातावरण दहशतीने भरून गेले. मद्यधुंद टोळक्याच्या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.