प्रेयसीच्या हत्येप्रकरणी तरुणाला जन्मठेप

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी तरुणाला जन्मठेप

ठाणे : प्रेयसीला घरी बोलावून तिची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. अमर देवानंद पाटील (23, रा. डोंबिवली, निळजे) असे आरोपीचे नाव असून स्वप्नाली घाडी असे मृत तरुणीचे नाव होते. न्यायमूर्ती एन. एच. मखरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणून ऍड्‌. विनीत कुलकर्णी यांनी काम पाहिले.

शाळेत एकत्र असल्याने अमर आणि स्वप्नाली यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात अमरने दुसऱ्या मुलीशी जवळीक साधल्याने स्वप्नालीने त्यास विरोध केला. त्यामुळे अमरने 31 मे 2015 रोजी तिला घराखाली भेटण्यास बोलावून धारदार कोयत्याने 27 वार करून तिची हत्या केली आणि मुंब्रा पोलिसांना शरण गेला. या खटल्यात बचावपक्षाच्या वकिलांनी मृतक गर्भवती असल्याचे कळल्याने आरोपी अमर संतापला.

रागाच्या भरात त्याच्याकडून हे कृत्य घडल्याने ही पूर्वनियोजित हत्या नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर सरकारी वकिलांनी साक्षीपुरावे न्यायालयासमोर मांडत युक्तिवाद खोडून काढला. त्यानुसार न्या. मखरे यांनी आरोपी अमर याला जन्मठेप सुनावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com