
Mumbai Crime News : मारहाणीचा जाब विचारला म्हणून शिवडीत हत्या...
मुंबई : चोरीचा आळ घेऊन मेहूण्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरूणाचा चौघांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. शेट्ठीबा विठ्ठल पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिवडी येथील दारूखाना परिसरात ही घटना मंगळवारी रात्री घडली.
याप्रकरणी शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.मुख्तार मोहिनुद्दीन शेख, मोहीन गुलामरसुल शेख, मैन्नुद्दीन मोलेड खान व मेहमुद मोहिउद्दीन शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. शेट्ठीबा विठ्ठल पवार यांच्याशी झालेल्या वादातून तीन आरोपींनी त्यांना मारहाण केली.
या मारहाणीत शेट्ठीबा पवार यांचा मृत्यू झाला . मृत व्यक्ती शिवडी दारुखाना परिसरातील सुजाता हॉटेल समोरील झोपडपट्टीत राहात होता. पवार यांची आई फुलाबाई यांच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली.