डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेला ठाकुरवाडी भागातील बेडेकर गल्लीमध्ये दांडिया खेळत असलेल्या एका तरूणावर चार जणांनी अचानक चॉपर, लोखंडी सळईन हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून यात कुणाल विजय कुशाळकर (वय 19) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.