

Dombivli Crime
ESakal
कल्याण : प्रेयसीने ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणाने थेट प्रेयसीचं घराला आग लावल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथे घडली आहे. घराला आग लागल्याने तरुणीसह तिच्या आई-वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी दीपेश रस्तोगी याला अटक केली आहे.