उल्हासनगरात लघुउद्योजक तरुणाचा निर्घृण खून

उल्हासनगरात लघुउद्योजक तरुणाचा निर्घृण खून

उल्हासनगर- भाड्याच्या खोलीत राजगिऱ्याचे लाडू, चिक्की बनवण्याचे काम करणाऱ्या एका लघुउद्योग अविवाहित तरुणाचा गळा आवळून व डोळा फोडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री उल्हासनगरात घडली आहे.

मात्र, या घटनेतील आरोपी अज्ञात असून सर्वत्र फिल्डिंग लावूनही पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागत नसल्याने आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान मध्यवर्ती पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

पश्चिमेला असलेल्या विठ्ठलवाडी रेल्वे तिकीट खिडकीच्या मागेच शिवेंद्र गुप्ता हा 20 वर्षीय अविवाहित तरुण एका भाड्याच्या खोलीत राजगिराचे लाडू, चिक्की चकली बनवण्याचे काम करतो. ही खोली गल्लीत आहे.काल शुक्रवार असल्याने या परिसरातील लघुउद्योग बंद राहतात. पहाटे शिवेंद्रचा मृतदेह तो राहत असलेल्या खोलीच्या काही अंतरावर मिळाला. त्याचा गळा आवळून डोळा फोडण्यात आला होता. त्याच्या तोंडात बोळा कोंबलेला होता. ही घटना समजताच, पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक आयुक्त मारुती जगताप, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस, पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे, प्रबोधन येजरे, उपनिरीक्षक योगेश गायकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिवसभर आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र फिल्डिंग लावली. पण हाती काहीच आले नसून गल्लीच्या परिसरातील सात-आठ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com