गँगस्टर युसुफ बचकानाच्या तीन हस्तकांना गुन्हे शाखेकडून अटक

गँगस्टर युसुफ बचकानाच्या तीन हस्तकांना गुन्हे शाखेकडून अटक

मुंबई : कर्नाटकातील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. हे आरोपी गँगस्टर युसूफ बचकानाचे हस्तक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

कर्नाटकच्या धारवाड येथे एका बांधकाम व्यावसायिकाची काही अनोळखी व्यक्तींनी 6 ऑगस्टला गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येत कर्नाटकमधील कुख्यात गुंड युसुफ सुलेमान कादरी उर्फ युसुफ बचकाना याचा हात असल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने याप्रकरणी निलेश नांदगावकर, सुनिल उर्फ मामा देवराम बनसोडे, नवनाथ अर्जुन डोळस या तिघांना याप्रकरणी पकडले.

आर्थिक व्यवहारातून युसुफच्या सांगण्यावरून  त्याच्या हैद्राबाद आणि मुंबईतल्या हस्तकांनी 6 ऑगस्ट रोजी कर्नाटकचा बांधकाम व्यावसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल उर्फ अलियास उर्फ फ्रुट इरफान याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणात ओल्ड हुबळी पोलिसांनी हत्या आणि हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. पोलिस तपासात या मागे युसुफचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी युसुफच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवल्यानंतर त्याता मुंबईतील हस्तक हा वारंवार त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कर्नाटक पोलिस त्याच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी गुन्हे शाखा 12 च्या पोलिसांकडे त्या हस्तकाला पकडण्यासाठी मदत मागितल्यानंतर दहिसर येथे सापळा रचून राजेंद्र उर्फ राजू नेपालीला अटक केली. या हत्याकांडमध्ये युसुफने आरोपीला गुन्ह्यांची माहिती देत, शूटर पुरवण्यासाठी गुन्ह्यांपूर्वी दोन लाख आणि गुन्हा घडल्यानंतर 10 लाख दिल्याचे निष्पन्न झाले. हा आरोपी या पूर्वी मुंबईच्या बोरिवली, कस्तुरबा,वनराई, पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

यातील आरोपी निलेश नांदगावकर हा एका हिरे लुटीच्या गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात बंद असताना त्याची ओळख युसुफ बचकाना आणि राजू नेपाळीशी ओळख झाली. मार्च 2020 मध्ये घाटकोपरमध्ये एका बांधकाम साईट संभाळण्याचे काम मिळण्यास नांदगावकरला अडचणी येत होत्या, तेव्हा युसुफने त्याला अडचणी दूर करून देतो असे सांगून धारवड येथील विकासकाची सुपारी दिली. त्या साठी त्याला दहा लाख रुपयेही दिले. त्यानुसार युसुफच्या सांगण्यावरून नांदगावकरने सुनिल उर्फ मामा देवराम बनसोडे, नवनाथ अर्जुन डोळस यांच्या मदतीने विकासकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या आरोपींना कर्नाटक पोलिस मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांच्या गावी पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी तिन्ही आरोपींना कुर्ला नेहरूनगरच्या एसटी स्टॅड येथून अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोण आहे युसुफ बचकाना

एकेकाळी कुख्यात गुंड छोटा राजनसाठी काम करणारा कर्नाटकचा गुंड युसुफ बचकाना तुरुंगातूनही सूत्र हालवत असल्याचे पून्हा एकदा पुढे आले आहे. युसुफवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या युसुफला म्हैसूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र कारागृहात बसूनही युसुफ हा आपली टोळी चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

Yusuf Bachkanas aide held from Mumbai for finishing real estate developer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com