esakal | यूसूफ लकडवाला यांचा कारागृहात मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Yusuf lakdawala

यूसूफ लकडवाला यांचा कारागृहात मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बांधकाम व्यावसायिक आणि फिल्म फायनान्सर युसूफ लकडवाला (yusuf lakdawala) यांचे ऑर्थर रोड कारागृहात (Arthur road jail) निधन झाले. मनी लॉंड्रिगच्या प्रकरणात ईडीने (enforcement directorate) लकडवाला यांना अटक केली होती. 76 वर्षाच्या युसूफ लकडवाला यांची आज सकाळी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात (JJ hospital) उपचारासाठी हलवण्यात आले होते. दुपारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. लकडवाला यांच्या मृत्युचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. पोस्टमार्टेम नंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. लकडवाला यांना कर्करोग (cancer) झाल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युचा गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा: दिड वर्षानंतर पोलीस बदल्यांना मुहूर्त; ८५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

एका मालमत्ता खरेदीत मनी लॉड्रींग झाल्या प्रकरणात ईडीने लकडवाला यांना मे महिन्यात अटक केली होती. खंडाळा इथे ५० कोटी किंमतीची जमीन खोटे कागदपत्र दाखवून खरेदी करण्याचा त्यांच्यावर आरोप होता. सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते. लकडवाला यांनी आरोग्याच्या कारणावरुन न्यायालयाकडे जामीन मागीतला मात्र ईडीने त्याला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा जामीन कोर्टाने फेटाळला होता.

loading image
go to top