
Shivsena : आदित्य ठाकरेंचे विश्वासू जाणार शिंदे गटात? फेसबुक पोस्टवरून चर्चेला उधाण
उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू अमेय घोले हे नाराज असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडली. यानंतर आता युवासेनातील पदाधीकारी देखील नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच लवकरच आदित्य ठाकरेंचे विश्वासू त्यांची साथ सोडू शकतात असे बोलले जात आहे.
युवासेना कोषाध्यक्ष असलेल्या अमेय घोले यांची युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेल्या अमेय घोले यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाची चर्चा होत आहे. अमय घोसे हे युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत आणि ते लवकरच शिंदे गटाची वाट धरू शकतात अशा चर्चाना उधाण आले आहे.
हेही वाचा: Jitendra Awhad: आता बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी! आव्हाडांकडून महिलेचा व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावा
पोस्ट काय आहे?
अमेय घोले लिहीतात की-
बघता बघता 2022 लोटून गेले..
काही गमावले, काही कमावले..पण तुम्ही प्रेम मात्र भरभरून निभावले..
आत्ता पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
माझ्या कर्तॄत्वाला देतोय आज पुन्हा एक नवी दिशा.
नवे निश्चय, नवी क्षितीजे.. सोबत तुमचे प्रेम मात्र तसेच असू द्या!
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया…
एकत्र मिळून हा नवा प्रवास एकमेकांसाठी सुखमय बनवूया..
हेही वाचा: Sharad Pawar : एकनिष्ठतेचं बाळकडू आईकडूनच! पवारांनी काँग्रेससाठी भावाविरोधात केला होता प्रचार
हेही वाचा: Tunisha Sharma death case: तुनिशाच्या पैशांवर आई-काका मारायचे मजा ... मैत्रिणीचा मोठा खुलासा
या पोस्टवरून घोले लवकरच शिंदे गटात सामिल होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मागील दिवसांपासून ते आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर नाराज आहेत. याबद्दाल त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चर्चा देखील केली आहे. तरीही याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असून या व्यक्तींमुळे युवासेनेचे नुकसान होत असल्याचं अमेय घोले यांचं म्हणणे आहे. त्यामुळे ते आदित्य ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे तर्क लावले जात आहेत.