Tunisha Sharma death case: तुनिशाच्या पैशांवर आई-काका मारायचे मजा ... मैत्रिणीचा मोठा खुलासा

Tunisha Sharma death case:
Tunisha Sharma death case:Esakal

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 नोव्हेंबर रोजी शोच्या सेटवर आत्महत्या करत जीवन संपवलं. अभिनेत्रीने शोच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर तिच्या आईने तिचा प्रियकर शिझानवर आरोप केले. शिझान आता कोठडीत आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येच्या प्रकरणात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. २ जानेवारीला शीझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन तुनिषा शर्माची आई आणि संजीव कौशल यांच्यावर आरोप केले. त्याने असा दावाही केला की तुनिषाच्या पैशावर तिची आई आणि काकांचे नियंत्रण होते आणि तुनिशाकडे पुरेसे पैसेही नसत. आता या प्रकरणाचा नवा मुद्दा समोर आला आहे.

Tunisha Sharma death case:
Tunisha Sharma Case: "ती फक्त पैशांच्या मागे..." शिझानच्या बहिनीचे तुनिशाच्या आईवर गंभीर आरोप..

तुनिषा शर्माची मैत्रिण सोनिया सिंहने आता एक नवीन खुलासा केला आहे. तुनिषा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होती आणि ती चांगले कमावत होती पण तरीही तुनिषाने अनेकदा सोनियाकडे पैसै मागितले आहे. आत्महत्येपूर्वीही तुनिषाने सोनियांकडे तीन हजार रुपयांचे कर्ज मागितले होते. तुनिषा शर्माला नेहमीच पैशांची चणचण राहायची.

Tunisha Sharma death case:
Urfi Javed: ऐकेल ती उर्फी कसली! चित्रा वाघ यांच्यासाठी उर्फीची नवी फॅशन..

तुनिषा शर्माच्या बाबतीत तिची मैत्रिण सोनिया सिंह म्हणाली, "तुनिषाला अनेकदा पैशांची कमतरता भासत होती. तिने अलीकडेच माझ्याकडे ३,००० रुपयांचे कर्ज मागितले होते. मी तिला कारण विचारले तेव्हा तुनिषाने सांगितले की, तिच्याकडे पैसे नाहीत."

Tunisha Sharma death case:
Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

इतकचं नव्हे तर तुनिशाने तिच्या मृत्यूच्या एका दिवसाआधी तिच्या आईशी खोटं बोलेली होती. तुनिषा शर्माची मैत्रिण सोनिया सिंग हिने दावा केला आहे की तिने आत्महत्येच्या एक दिवस आधी आईला खोटे बोलण्यास सांगितले होते. तुनिषाने सोनियाला फोन केला होता आणि सांगितले होते की, जर तिच्या आईचा फोन आला तर तुनिशा माझ्यासोबत आहे. मात्र तिने असं का केलं हे सोनियाही माहित नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com