अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची युवा सेनेची यूजीसीकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची युवा सेनेची यूजीसीकडे मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) केली आहे.

सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा - अनिल परब 

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याची घोषणा केली. इतर वर्षांतील विद्यार्थांना पुढील वर्गांत पाठवण्याचा निर्णय घेतला.

नोकरी गेली तरी घाबरू नका ! सरकारची 'ही' योजना देते दोन वर्षांचा पगार...

अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षा कोणत्या वातावरणात होणार, याची चिंता पालकांना असल्याने अंतिम वर्षांच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी युवा सेनेने यूजीसीकडे केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही मागणी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Yuva Sena demands UGC to cancel final session exams

loading image
go to top