Mumbai Rains : पावसाने रोखली आदित्य ठाकरेंची वाट

Aditya Thackeray
Aditya Thackeray

मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला. वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर पडता आले नाही.

आदित्य ठाकरे यांना पालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन मुंबईतील एकूण पावसाळी परिस्थितीचा आढावा घ्यायचा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला. याचवेळी आदित्य ठाकरे यांना देखील कक्षात यायचं होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी काही काळ आदित्य यांची वाट ही पाहिली, मात्र आदित्य न आल्याने मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि ते निघून गेले.

रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मातोश्री परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने मातोश्री परीसरातील वाहन इतरत्र हलवल्याने आदित्य यांना वेळेवर येता आले नाही. शेवटी आदित्य यांना घेण्यासाठी काही नगरसेवक मातोश्री बाहेर पोहोचल्यानंतर त्यांच्या मदतीने आदित्य उशिरा पालिकेच्या आपात्कालीन कक्षात पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com