मुंबईत 'शून्य' कंटेंटमेंट झोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत 'शून्य' कंटेंटमेंट झोन

मुंबई : नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून परिणामी मुंबईतील कंटेंटमेंट झोन ची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आल्याचे दिसू लागले आहे.

ज्या इमारतीमध्ये 5 पेक्षा अधिक बाधित रुग्ण सापडत होते ती संपूर्ण इमारत महानगरपालिकेकडून सील करण्यात येत होती. कोरोना संसर्ग ऐन भरात असतांना महानगरपालिकेने सील केलेल्या इमारतींची संख्या हजारांच्या घरात होती. मात्र 18 महिन्यानंतर ही संख्या शून्यावर आली आहे.

मुंबईतील काही परिसरात मायक्रो कंटेंटमेंट झोन आहेत. त्यात केवळ 12 इमारतींचा समावेश आहे. या पैकी के वेस्ट 4, डी 3, एफ उत्तर 2,आर साऊथ,एम वेस्ट आणि ए मध्ये प्रत्येकी 1 इमारत सील करण्यात आली आहे. या सील केलेल्या 12 इमारतींमध्ये 5 हजार घरांमधील 20 हजार राहिवाश्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: राजुरा : नापिकीला कंटाळून युवकाची आत्महत्या

मुंबईत 992 सक्रिय मजले सील करण्यात आले असून 42 हजार घरांचा समावेश आहे. त्यात 1 लाख 76 हजार रहिवाशी वास्तव्यास आहेत. त्यात के वेस्ट 148,के पूर्व 104 आणि आर साऊथ 197 सील केलेल्या मजल्यांचा समावेश आहे.मुंबईत आतापर्यत 66,238 सील केलेल्या इमारती आणि मजले कंटेंटमेंट झोन मधून मुक्त करण्यात आले आहेत.

loading image
go to top