मुंबईकरांनी अनुभवला "झिरो शॅडो डे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - मुंबईतली आजची सावली गायब होण्याची वेळ म्हणजे दुपारी 12.34 वाजताची. पण ढगांची ऐनवेळी झालेली गर्दी, ऊन-ढगांचा लपंडाव अशा सगळ्या प्रतिकूल वातावरणातही सावलीने साथ सोडल्याचा अनुभव अखेर मुंबईकरांना घेता आला. नेहरू तारांगणसमोर काही विज्ञानप्रेमींची ही संधी पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती होती. 

सूर्याच्या दक्षिणायनाच्यानिमित्ताने कोणत्याही सरळ वस्तूची सावली पायाखाली येण्याचा हा अनुभव अनेकांनी अनुभवला. उद्या (ता. 16) 12.36 वाजता हा "झिरो शॅडो डे' अनुभवता येईल. पृथ्वीवर चालणाऱ्या सावल्यांच्या गमती जमतीचा अभ्यासही या निमित्ताने केला जाईल. विज्ञान प्रसाराच्या मोहिमेंतर्गत भारतीय खगोलशास्त्र परिषदेतर्फे हा पृथ्वीचा परीघ शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. या वर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हौशी आकाश निरीक्षक, विज्ञानाचे अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी अशा सगळ्यांना या मोहिमेत सहभागी होता येईल. राष्ट्रीय पातळीवर या मोहिमेचा सहभाग असणार आहे. लवकरच परिषदेमार्फत या अभियानात सहभागी कसे होता येईल, याची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेत सहभागी होण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळेच परिषदेच्या माध्यमातून विज्ञान प्रसारासाठीचे हे अभियान अतिशय महत्त्वाचे असल्याची माहिती नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. 

पृथ्वीचा परीघ मोजण्याच्या निमित्ताने कोणते कल्पक प्रयोग व पद्धती राबवता येतात, हे आगामी दिवसांत पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Zero Shadow Day