

Gut Microbiome and Immune System Connection
sakal
डॉ. मृदुल देशपांडे
आहारमंत्र
घसा दुखला, सर्दी-खोकला झाला, ताप आला, की अनेक जण लगेच अँटिबायोटिक घेतात. काही वेळा डॉक्टरांकडून, तर कधी स्वतःहून. काही दिवसांनी बरं वाटतं; पण नंतर पुन्हा आजार डोकं वर काढतो. फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीने हा केवळ योगायोग नाही. वारंवार अँटिबायोटिक्स घेणं म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट हल्ला करणं होय.