लाइफस्टाइल कोच : प्रतिकारशक्तीचा चौथा स्तंभ : झोप

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 9 June 2020

झोपेचा दर्जा आणि प्रमाणाचा टी पेशींच्या निर्मितीशी थेट संबंध असल्याचे नुकतेच एका अभ्यासात आढळले. अशा झोपेमुळे टी पेशींची कार्यक्षमता सुधारते आणि त्या रोगजंतूंना नष्ट करू शकतात. त्याचप्रमाणे, या पेशींकडून सायटोकाइनचीही निर्मिती केली जाते. सामान्यतः ही प्रक्रिया रात्री होते. सायटोकाइनची निर्मिती अधिक असेल, तितकी आपल्या प्रतिकारशक्तीत वाढ होते.

झोपेचा दर्जा आणि प्रमाणाचा टी पेशींच्या निर्मितीशी थेट संबंध असल्याचे नुकतेच एका अभ्यासात आढळले. अशा झोपेमुळे टी पेशींची कार्यक्षमता सुधारते आणि त्या रोगजंतूंना नष्ट करू शकतात. त्याचप्रमाणे, या पेशींकडून सायटोकाइनचीही निर्मिती केली जाते. सामान्यतः ही प्रक्रिया रात्री होते. सायटोकाइनची निर्मिती अधिक असेल, तितकी आपल्या प्रतिकारशक्तीत वाढ होते. प्रतिकारशक्ती मजबूत बनविण्यासाठी दीर्घकाळाची चांगली झोप महत्त्वाची असते, ती त्यामुळेच. त्याचप्रमाणे, झोपेचे आपल्या शरीरावरही अप्रत्यक्षपणे काही परिणाम होतात. रात्री जागरण केल्याने आपल्या शरीरातील लेप्टिन या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनची पातळी घटते. त्यामुळे, रात्री जागरण करणाऱ्या अनेकांना उशिरा भूक लागते. त्यामुळे, आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे अपुऱ्या झोपेमुळे इतर समस्याही निर्माण होऊ शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मेंदूचे घड्याळ
आपल्या मेंदूचे दिवस-रात्रीचे चक्र निश्चित असते. त्याला ‘सर्कडियन रिदम’ असे म्हणतात. हा ‘रिदम’ किंवा ताल झोपेचे संप्रेरक नेमके कधी सोडायचे व कधी थांबवायचे हे ठरवतो. त्याचप्रमाणे, ही प्रक्रिया आपल्या डोळ्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशावरही खूपशी अवलंबून असते. तथापि, आपला मेंदू नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाशातील फरक समजून घेण्यास सक्षम नसतो. रात्री बिछान्यावर जाण्यापूर्वी स्मार्टफोन न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात, त्याला हाच आधार आहे.

कृत्रिम प्रकाशालाही आपला मेंदू सूर्यप्रकाश समजून प्रतिसाद देतो. तो झोपेची संप्रेरके थांबविण्यास सुरुवात करतो. यातूनच निद्रानाश जडतो. त्यामुळेच आता येथून पुढे तरी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती आणि एकूणच आरोग्यासाठी काही नियम पाळावेच लागतील.

1) दररोज किमान सात-आठ तास पुरेशी झोप घ्यावी.
2) झोपण्याची व उठण्याची वेळ निश्चित करा. 
3) झोपण्यापूर्वी दोन तास काहीही खाणे टाळा.
4) बिछान्यावर जाण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल पाहू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr manisha bandisthi on lifestyle