
एकेकाळी एक योगी होते, जे एका कश्मिरी शैव परंपरेचे होते. हा योगाच्या सात प्रकारांपैकी एक प्रकार आहे. हे योगाचे एक अतिशय शक्तिशाली स्वरूप आहे, परंतु ते विशेषत्वाने काश्मीर प्रदेशातच सीमित राहिले आहे, म्हणून त्याला हे नाव पडले. एक दिवस या योगीला एक अंडकोष दिसला, जो किंचितसा तडकलेला होता आणि त्यातले फुलपाखरू बाहेर पडण्यासाठी धडपडत होते - अंडकोषाचे कवच खूप कठीण होते.
एकेकाळी एक योगी होते, जे एका कश्मिरी शैव परंपरेचे होते. हा योगाच्या सात प्रकारांपैकी एक प्रकार आहे. हे योगाचे एक अतिशय शक्तिशाली स्वरूप आहे, परंतु ते विशेषत्वाने काश्मीर प्रदेशातच सीमित राहिले आहे, म्हणून त्याला हे नाव पडले. एक दिवस या योगीला एक अंडकोष दिसला, जो किंचितसा तडकलेला होता आणि त्यातले फुलपाखरू बाहेर पडण्यासाठी धडपडत होते - अंडकोषाचे कवच खूप कठीण होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सहसा, फुलपाखरू अंडकोशातून बाहेर पडण्यासाठी जवळजवळ अठ्ठेचाळीस तास सतत संघर्ष करते. आणि एवढ्या वेळात ते बाहेर येऊ न शकल्यास ते मरते. योगीने हे पाहिले आणि त्याच्यातील करुणेमुळे त्याने त्याच्या नखांच्या साहाय्याने अंडकोष उघडला, फुलपाखराला मोकळे केले. पण जेव्हा ते फुलपाखरू बाहेर आले, त्याला उडता येईना. तर, ह्यासाठीच आहे अंडकोष फोडून बाहेर पडण्याचा तो संघर्ष, ज्यामुळे फुलपाखराला त्याचे पंख वापरायला आणि उडायला सामर्थ्य मिळते. अशा फुलपाखराचा उपयोगच काय ज्याला उडताच येत नाही. तर आज बरेच लोक, प्रेम असे समजून त्यांच्या मुलांखातर ते जे काही करत आहेत, खरं पाहता ते त्यांना असेच पंगू बनवते आहे. ही मुले त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेऊ शकत नाहीत. तर आपण मुलांचे लाड करतो आहे की नाही हे आपल्याला कसे कळणार? सर्व मुलांसाठी लागू होईल असे काही ठरलेले प्रमाण नाही. सर्वच मुले एकसारखी नसतात.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काही पालकांमध्ये त्यांच्या मुलांना अतिशय सामर्थ्यवान बनविण्याची आकांक्षा किंवा महत्त्वाकांक्षा असते, यामुळे मुलांना अनावश्यकपणे खूप त्रास सहन करावा लागतो. या पालकांना असे वाटते, की त्यांच्या मुलांनी असे काहीतरी करावे जे ते स्वतः कधी करू शकले नाही. मुलांच्या माध्यमातून त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत, काही पालक त्यांच्या मुलांबरोबर अत्यंत क्रूर वागतात. इतर पालक, ज्यांचा असा विश्वास आहे की ते त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात, त्यांनी त्यांचे जास्तच लाड केले आणि त्यांना या जगात असमर्थ आणि निरुपयोगी करून टाकले. या स्थितीत काही प्रमाणात विवेकबुद्धी वापरायची गरज आहे. किती लाड करावेत आणि किती नाही याबद्दल कोणतीही परिपूर्ण रेखा आखली जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या स्तराचे लक्ष देण्याची, प्रेमाची आणि कठोरपणाची आवश्यकता असू शकते. हे असे आहे की, समजा तुम्ही आलात आणि मी नारळाच्या बागेत उभा असताना मला विचारलेत, ‘‘प्रत्येक झाडाला मी किती पाणी द्यायला पाहिजे?’’ आणि मी म्हणालो, ‘‘कमीतकमी ५० लिटर.’’ पण जर तुम्ही घरी गेलात आणि तुम्ही गुलाबाच्या रोपालाच ५० लिटर पाणी घातले तर ते मरून जाईल. तर तुम्ही हे पाहिले पाहिजे की तुमच्या घरात कुठल्या प्रकारचे रोप आहे.
आपल्याला खरोखरच आपल्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असल्यास आपण हे प्रथम पाहिले पाहिजे की, आपण स्वतःमध्ये काही परिवर्तनात्मक बदल घडवून आणू शकतो का? पालक बनण्याची इच्छा असलेल्यांनी एक सोपा प्रयोग केला पाहिजे. त्यांनी यासाठी थोडा वेळ काढून थोडे मनन, चिंतन करायला हवे, की त्यांच्या आयुष्यात असे काय आहे जे ठीक नाहीये आणि त्यांच्या आयुष्यासाठी काय ठीक असू शकेल? बाहेरील जगासाठी नाही, तर स्वतःसाठी. तुमच्या स्वतःबद्दल - तुमचे स्वतःचे वर्तन, बोलणे, तुमची एखादी कृती करण्याची पद्धत आणि तुमच्या सवयी- जर तुम्ही तीन महिन्यात हे बदलू शकलात, तर तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा उत्तमरीत्या हाताळू शकाल.