इनर इंजिनिअरिंग : तुमची जागरूकता वाढवा

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
मंगळवार, 14 जुलै 2020

जागरूकता तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही. ज्याला तुम्ही जीवन म्हणून संबोधता ती केवळ जागरूकता आहे. आत्ता तुमच्यासमोर काय घडत आहे हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही जिवंत, जागरूक आहात. तुमच्या आसपास काय घडत आहे, याची तुम्हाला जाणीवच नसल्यास तुम्ही जिवंत नाही. म्हणून जिवंतपणा आणि जागरूकता ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत. प्रश्न आहे, तुम्ही किती जागरूक किंवा जिवंत होऊ इच्छिता?

जागरूकता तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही. ज्याला तुम्ही जीवन म्हणून संबोधता ती केवळ जागरूकता आहे. आत्ता तुमच्यासमोर काय घडत आहे हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही जिवंत, जागरूक आहात. तुमच्या आसपास काय घडत आहे, याची तुम्हाला जाणीवच नसल्यास तुम्ही जिवंत नाही. म्हणून जिवंतपणा आणि जागरूकता ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत. प्रश्न आहे, तुम्ही किती जागरूक किंवा जिवंत होऊ इच्छिता?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शारीरिकदृष्ट्या जिवंत असणे आपोआप घडते. ते निसर्गाने तुमच्यासाठी केले आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या जिवंत असल्याने त्याला शिखरापर्यंत वाढवणे हाच मुद्दा आहे. तुम्ही याप्रती पूर्णपणे अजाण नाही. तुम्हाला तुमच्यासाठी अनावश्यक गोष्टींची जाणीव आहे, मात्र अत्यंत महत्त्वाचे काय, याची जाणीव नाही. प्रश्न जागरूक होण्याचा नाही, तर जागरूकतेचे लक्ष गरज नसलेल्या ठिकाणीवरून काढून; जिथे सर्वांगीण कल्याण असलेल्या ठिकाणी एकाग्र करणे आहे. तो बदल व्हायलाच हवा. डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात, की तुमच्या शारीरिक रचनेत पुष्कळ काही होत आहे, परंतु याची तुम्हाला जाणीव नाही.  तुम्ही शरीराबरोबरच शरीररचनेत घडत असलेल्या गोष्टींबद्दलही जागरूक होऊ शकता. हे गरजेचं आहे असं नाही, परंतु सामान्यत: लोकांना जागरूकता एका आयामातून दुसऱ्यात बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; त्यांना ऊर्जेची गरज असते. प्राणऊर्जा नसल्‍यास तुमच्या जागरूकतेचा स्तर वाढणार नाही. अध्यात्मिक प्रक्रियेत साधना करण्याचे हेच मुख्य कारण आहे.

पुस्तकी तत्वज्ञानींना, जे अध्यात्मिकता पुस्तकांच्या माध्यमातून करतात, त्यांना वाटते साधना करण्याची गरजच नाही. ‘मी फक्त पूर्णतः जागरूक आहे,’ ही मोठी लबाडी आहे. तुम्ही बौद्धिकदृष्ट्या जागरूक होण्याने जीवनाच्या दुसऱ्या आयामात जाता येत नाही. एवढेच की, एका गोष्टीबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कशाबद्दल बोलता - तुम्ही तुमच्या करमणुकीचा विषय सिनेमाच्या तारकापासून श्रीकृष्णात बदलला आहे. यामुळे मुळीच फरक पडत नाही, कारण तुमची मूलभूत रचना, दृष्टिकोन आणि वृत्ती अद्याप त्याच आहेत. 

तुमची जागरूकता एका आयामातून दुसऱ्यात बदलायची असल्यास तुम्ही तुमच्या प्राणऊर्जा प्रणालीवर काम केले पाहिजे. प्राणऊर्जा वाढल्यास तुम्हाला अचानक बऱ्याच गोष्टींची जाणीव होईल. ती अनेक प्रकारे वाढवली जाऊ शकते. हे एखादे गाणे गाऊन किंवा तुमच्यातील उत्कट प्रेमामुळे होते. जीवनाच्या निखालस तीव्रतेमुळेसुद्धा होते किंवा ती नित्यनियमित योग्यसाधनेने निरंतरपणे प्रस्थापित केली जाते.  

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sadguru on Raise your awareness