esakal | चेतना तरंग : ईश्वरीशक्तीचे ज्ञान हवे!
sakal

बोलून बातमी शोधा

sri-sri-ravi-shankar

ज्ञान सांभाळून ठेवण्याची चिंता करण्याचे तुम्हाला काही एक कारण नाही. विवेकाच्या रुपात ज्ञान तुमच्यामध्ये सामावून जाईल, तेव्हा ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. विवेक हृदयात मिसळून जातो. ईश्वराला आपला व्हॅलेंन्टाईन, आपला प्रियतम बनवा. हेच जीवनातील पहिले आणि अंतिम कार्य आहे. आपले हृदय खूपच कोमल आहे. त्याला एका सुरक्षित ठिकाणी ठेवा. घटना, तसेच क्षुल्लक गोष्टी त्याच्यावर खोल परिणाम करतात.

चेतना तरंग : ईश्वरीशक्तीचे ज्ञान हवे!

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

ज्ञान सांभाळून ठेवण्याची चिंता करण्याचे तुम्हाला काही एक कारण नाही. विवेकाच्या रुपात ज्ञान तुमच्यामध्ये सामावून जाईल, तेव्हा ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. विवेक हृदयात मिसळून जातो. ईश्वराला आपला व्हॅलेंन्टाईन, आपला प्रियतम बनवा. हेच जीवनातील पहिले आणि अंतिम कार्य आहे. आपले हृदय खूपच कोमल आहे. त्याला एका सुरक्षित ठिकाणी ठेवा. घटना, तसेच क्षुल्लक गोष्टी त्याच्यावर खोल परिणाम करतात. आपले हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मनाला स्वस्थ अन् पवित्र राखण्यासाठी ईश्वराहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेच स्थान मिळणार नाही. तुम्ही आपले हृदय ईश्वराला अर्पण कराल, तेव्हा काळ, घटना तुम्हाला स्पर्श करणार नाहीत. त्याची काही निशाणीही तुमच्यावर उमटणार नाही. एखादे मूल्यवान रत्न हरवू नये आणि वापरता यावे म्हणून सोन्यात किंवा चांदीत जडवतात. त्याचप्रमाणे विवेक आणि ज्ञान आपल्या हृदयाला ईश्वरामध्ये साठवून ठेवतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

  • तुमचे घर हे देवघर बनवा आणि मग तिथे प्रकाश, आनंद आणि समृद्धी नांदेल.
  • तुमचे शरीर देवाचे वसतिस्थान बनवा आणि मग तिथे शांती आणि परमानंद असेल.
  • तुमचे मन हे देवाचे खेळणे आहे, अशी भावना ठेवा आणि मग बघा तुम्ही त्याच्या साऱ्या खेळाचा आनंद घ्याल.
  • संपूर्ण जगाकडे देवाची क्रीडा आणि प्रदर्शन अशा दृष्टीने बघा. मग अद्वैत भावाने तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवाल.
  • कित्येक प्रकाराने तुम्हाला आशीर्वाद मिळतात.
  • तुम्ही उदार असल्यास समृद्धीच्या स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद मिळतात.
  • तुम्ही मेहनती असल्यास आनंदाच्या स्वरुपात तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
  • तुम्ही आळशी असल्यास कष्टाच्या स्वरुपात तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
  • सुखलोलुप असल्यास निर्विकारतेच्या स्वरुपात तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
  • तुम्ही निर्विकार असल्यास आत्मज्ञानाच्या स्वरुपात आशीर्वाद मिळतील.