esakal | माझा फिटनेस : रोज एक तास द्याच...
sakal

बोलून बातमी शोधा

swati kshirsagar

निरोगी शरीर, शांत डोके आणि सकारात्मक विचारसरणी यांची जोड म्हणजे वेलनेस. कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य जपणे एक आव्हानच. मी दिवसाची सुरुवात सकाळी ६ वाजता घरातील जिममध्ये जाऊनच करते.

माझा फिटनेस : रोज एक तास द्याच...

sakal_logo
By
स्वाती क्षीरसागर, अभिनेत्री

निरोगी शरीर, शांत डोके आणि सकारात्मक विचारसरणी यांची जोड म्हणजे वेलनेस. कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य जपणे एक आव्हानच. मी दिवसाची सुरुवात सकाळी ६ वाजता घरातील जिममध्ये जाऊनच करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यायामासाठी मी सकाळचा दीड तास राखीव ठेवला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात छान, ताजीतवानी होते. मी वेट ट्रेनिंग, कार्डिओ, इंटेन्स वर्कआऊट, फंक्शनल वर्कआऊट करते. हे सर्व प्रकार मी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली‌ करते. दर रविवारी आराम करते. आरोग्य उत्तम राखायचे असल्यास तुमच्या व्यायाम, डाएटमध्ये सातत्य हवे. मी जेवणाच्या वेळा खूप काटेकोरपणे पाळते. जिमला जाण्यापूर्वी ओट्स आणि दूध, किंवा ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर असा आहार घेते. त्यानंतर सकाळी ९ वाजता नाश्ता करते. त्यात उकडलेले अंडे, प्रोटिन शेक असतो. दुपारी १ वाजता जेवण आणि ५ वाजता हलका स्नॅक्स घेते. त्यामध्ये एखादे फळ किवा ज्यूसला पसंती देते. रात्रीच्या जेवणात फक्त उकडलेले चिकनच खाते. भाताचा समावेश नसतो. मी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ खाते. खूप कमी तेल वापरून बनवलेले जेवण मला आवडते. आठवड्यातून एकदा चीट डे असतो, या दिवशी मी कांदा भजी, पाणीपुरी, बर्गर असे आवडते पदार्थ खाते. तसेच, दिवसाला ३-४ लिटर पाणी पिते.

सध्या वाढत्या स्पर्धेमुळे मानसिक स्वास्थ्य जपणे फार महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी मी दिवसातून १५ मिनिटे ध्यान करते. त्यामुळे मनःशांती मिळते. पुरेपूर झोप घेणे हे देखील मानसिक आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. ‘लव्ह लग्न लोचा’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘घाडगे ॲंड सून’, ‘दुहेरी’ आदी मालिकांमधून मी अभिनय केला आहे. अभिनय क्षेत्रात तुम्ही फिट दिसणे व फिटनेस मेन्टेन करणे फार गरजेचे असते. व्यायाम माझ्या लाइफस्टाइलचा भाग आहे. अशीच शरीरयष्टी राहावी म्हणून मी नियमितपणे व्यायाम करते. तसेच, सोशल मीडियावर काही फिटनेस ब्लॉगर्सना फॉलो करते. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी दिवसातून किमान एक तास तरी व्यायामासाठी काढावा. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

loading image