

Importance of Good Body Posture
Sakal
महेंद्र गोखले
(फिटनेसविषयक प्रशिक्षक)
शरीराचे पोश्चर चांगले राखणे हे उत्तम शरीर रचनेइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचा भार दोन्ही पायावर समान ठेवल्यास शरीराची कार्यें दुखापतींशिवाय प्रभावीपणे पार पाडता येतात. आपण ॲथलिट असलो किंवा नसलो तरी हे पोश्चर आपल्याला खेळ किंवा रोजच्या हालचाली करण्यास मदत करते. पोश्चर योग्य नसल्यास काही सोप्या हालचाली करताना देखील दुखापत होऊ शकते.