योग ‘ऊर्जा’ : 'प्राणायाम: परं तप:'

देवयानी एम., योग प्रशिक्षक
Tuesday, 10 November 2020

प्राणायामाचा आपण या अगोदरच्या अनेक लेखांमध्ये विविध अंगांनी अभ्यास केला. या वर्षात कोरोनामुळे प्राणायामाचा आपोआप आणखी प्रचार व प्रसारदेखील झाला. पण, याचा सराव योग्य मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.

प्राणायाम हा योगातील सर्वाधिक लोकप्रिय अभ्यास आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. वेद, स्मृती, पुराण, भगवद्‍गीता, विज्ञान भैरव, योगतारावली, पातंजल योगसूत्रे, हठप्रदीपिका, घेरंड संहिता इत्यादींसारख्या अनेक योगग्रंथांमध्ये प्राणायामाचे महत्त्व वारंवार आले आहे. प्राणायामाचा आपण या अगोदरच्या अनेक लेखांमध्ये विविध अंगांनी अभ्यास केला. या वर्षात कोरोनामुळे प्राणायामाचा आपोआप आणखी प्रचार व प्रसारदेखील झाला. पण, याचा सराव योग्य मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. कारण, हठप्रदीपिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे योग्य प्राणायाम अनेक रोगांचा नाश करतो. परंतु, चुकीच्या सरावाने आपण नसलेल्या रोगांना आमंत्रण देऊन बसतो. आपल्या शरीराच्या प्रत्येक यंत्रणेवर, प्रत्येक संस्थेवर प्राणायामाचा कसा प्रभाव पडतो ते पाहू...

पचन संस्था (Digestive System) 
पोटातील स्राव सुधारल्यामुळे हलकेपणा राहतो, भुकेचे नियमन होते आणि पचन सुधारते. वेळेवर भूक लागणे आणि वेळेवर पोट साफ होणे हे होऊ लागते. अतिभूक असल्यास ती हळूहळू कमी होऊन आवश्यकतेइतपतच खाल्ले जाते.

श्वसन संस्था (Respiratory System) 
श्वास दीर्घ, संथ, लयबद्ध व सहज होऊ लागतो. फुप्फुसांची क्षमता, लवचिकता वाढते; ज्याने स्टॅमिना सुधारतो.

रक्ताभिसरण संस्था  (Circulatory System) 
उच्च रक्तदाब कमी होतो, मायक्रो सर्क्युलेशन सुधारते, पल्स रेट कमी व लयबद्ध होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. सर्व आंतरिक अवयव, प्रत्येक पेशीचे अभिसरण सुधारते. शरीरातील अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या प्रवाहाचे कार्य सुधारते; ज्याने त्यात संचय होत नाही.

हेही वाचा : योग सरावात घ्यायची काळजी 

लसिका संस्था  (Lymphatic System) 
शरीरातील विविध टॉक्सिन्स, बॅक्टेरिया, व्हायरस यांचा नाश करणारी ही यंत्रणा. प्राणायामाने लसिका संस्थेचे कार्य सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

स्नायू, सांधे व हाडांचे आरोग्य (Muscles, Joints, Bones)
प्राणायामाने मसल टेन्शन कमी होऊन स्नायूंची वेदना कमी होते; कारण मायक्रो सर्क्युलेशन सुधारते. स्नायूंची लवचिकता वाढते आणि त्यांचे अर्ली एजिंग टाळता येते. लिगामेंट व कार्टिलेजचे सर्क्युलेशन सुधारते, बोनमॅरोचे कार्य सुधारते, मेनोपॉजचा त्रास कमी होतो.

हार्मोन्स (Hormones) 
प्राणायामाने स्ट्रेस कमी होतो आणि हॉर्मोन्सचे संतुलन टिकून राहते. दीर्घकाळ तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत होते. चयापचयाचे कार्य उत्तम राहते. मासिक पाळीचे त्रास टाळता येऊ शकतात.

हेही वाचा :  योग ‘ऊर्जा’ : व्हेरिकोज व्हेन्स

मज्जा संस्था (Nervous System) 
भावनिक-वैचारिक उत्तेजन कमी होऊन मेंदूतील ती केंद्रे शांत राहतात. मेंदूतील रासायनिक संतुलन अत्यंत गरजेचे असते; जे प्राणायामाने साध्य होते. प्राणायामाने जागरूकता वाढते. डिमेंशियासारखे मेंदूचे डिजनरेटिव्ह विकार टाळू शकता येतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्वचा (Skin) 
केस व चेहऱ्याचे आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहते; कारण त्यांचे रक्ताभिसरण सुधारते. सतत अ‍ॅलर्जी व रॅश येणे कमी होते. चेहऱ्यावर तेज दिसू लागते.
अर्थात, ‘सब दुखोंकी एक दवा’ असे योगाभ्यासाकडे बघून चालणार नाही. पतंजली मुनी म्हणतात तसे, ‘‘स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि:’’ म्हणजे दीर्घकाळ, खंड न पडता, मनापासून, आवडीने, जीवनशैलीचा भाग म्हणून सराव केला, तरच याचे फायदे मिळतील! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devyani M article about pranayam