Video : परीक्षेत यशाची  ‘चव’

डॉ. मनीषा बंदिष्टी
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मुलांना शांत ठेवण्यासाठी, त्यांची मानसिक सजगता आणि एकाग्रता वाढविण्यासाठी मुलांचा आहार अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे ती परीक्षेत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ करू शकतील. 

लाइफस्टाइल कोच -
परीक्षांचा मोसम आता सुरू होतोय. या काळात विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही प्रामुख्याने अभ्यासाबद्दल काळजीत असतात. मात्र, मुलांना शांत ठेवण्यासाठी, त्यांची मानसिक सजगता आणि एकाग्रता वाढविण्यासाठी मुलांचा आहार अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे ती परीक्षेत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ करू शकतील. 

हे टाळा
सोडा, कोला आणि कॉफी आदी. यामुळे नैराश्य वाढते.
मेंदू संथ करणारे गोड पदार्थ (कुकीज, केक, कॅंडी, चॉकलेट), तळलेले पदार्थ (चिप्स, सामोसा इ.) आणि तार्किक क्षमता घटविणारे इतर गोड पदार्थ.
उदा. अधिक प्रमाणात भात आणि बटाटे खाल्ल्यामुळेही तुम्हाला कंटाळवाणे, सुस्त वाटू शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय खाल?
परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्या मेंदूला भरपूर एनर्जीची गरज असते. तुम्ही परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते, भुकेवर नव्हे. तुमच्याकडे अजिबात खाद्यपदार्थ नसल्यास फळे, नट्स, फ्रुट मिल्कशेक आदी घ्या. मात्र, खाद्यपदार्थांचा पर्याय असल्यास तुम्ही थोड्या प्रमाणात पोहे, पराठाही खाऊ शकता. परीक्षेपूर्वी भरपेट खाल्ल्यास परीक्षेमध्ये तुम्हाला झोप येऊ शकते.  

परीक्षेला जाण्यापूर्वी
सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्या.
तुमचा मेंदू आणि शरीर ‘ऑन’ करा. दिवसाची ‘फ्रेश’ सुरुवात करा.

पेपरवरून आल्यानंतर...
पालकांनी प्रश्नपत्रिकेबद्दल प्रश्न विचारणे टाळावे. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्याचा पुढील पेपरवर परिणाम होऊ शकतो. 
आहारात पनीर, अंडी, चिकन, मासे, मिश्र दाळी आदी प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
भात आणि बटाटे देणे टाळावे.
मुलांना विश्रांती घेऊ द्यावी. काहीवेळ खेळू द्यावे. त्यामुळे त्यांचे मन पुन्हा ताजेतवाने होऊन ते पुढील अभ्यासासाठी तयार होतील. 
परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा...

जंकफूडवर नियंत्रण ठेवा
अनेक मुलांना विशेषत: रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना चिप्ससारखे जंकफूड खाण्याचा आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय असते. त्याऐवजी खालील पर्याय निवडावेत.
हम्मस, हंग कर्डमध्ये बुडवलेले गाजराचे तुकडे सोबत ठेवावेत.
बदाम, ड्राय बेरीज, अंजीर, जवस, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया, चने आदी मेवाही बाळगावा.
कमी साखरयुक्त लिंबू सरबत किंवा स्ट्रॉबेरी, ॲपल मिल्कशेक घ्यावा.  

परीक्षेच्या काळात आहारात कशाचा समावेश कराल?
मेंदूला चालना देणारे पदार्थ (उदा. अंडी, पनीर, फळे, मासे, अक्रोड, जवस आदी) घ्यावेत. हे पदार्थ विचारक्षमता, मानसिक सजगता, एकाग्रता वाढवतात. 
रोग प्रतिकारशक्ती वाढवून मुलांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी पदार्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Manisha Bandishti article exam time and food