इनर इंजिनिअरिंग : भक्तीतील एकरूपता... 

sadguru
sadguru

भक्ती म्हणजे तुमच्या भावनेला तीव्रतेच्या सर्वोच्च स्तरावर घेऊन जाणे. भक्तीला सर्वोच्च मानवी भावना म्हणून पाहिली जाते, कारण यात गुंतागुंत अतिशय कमी असते - ती तुम्हाला मुक्त करते. पण तुमचे स्वतःचेच काही पूर्वनियोजित संकल्प असल्यास भक्तीच्या पाठीमागे तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण तेव्हा तुम्ही भक्त असणे शक्यच नाही. भक्तगण अतिशय सुंदर असतात, ते त्यांच्यात तंद्रीत मस्त असतात. पण जग त्यांना बहुधा वेडपट आणि तर्कशून्य म्हणून पाहते.

कर्नाटकातील प्रसिद्ध संत महादेवी अक्का, मीराबाईसारखे संत अतिशय बेधुंद होते, तुम्ही त्यांच्याबरोबर राहू शकला नसता. मात्र, ते या जगातून गेल्यावर तुम्ही त्यांची पूजा करू शकता, पण त्या जिवंत होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर खरेच काय घडत होते, हे कुणालाच कधी कळले नाही. उदा. मीराबाई स्वतःला श्रीकृष्णाची पत्नी समजायची. ती नेहमी अशा उन्मुक्त अवस्थेत जायची की जणू खरेच कृष्ण तिच्याजवळ आहे. ती त्याच्याबरोबर नाचायची, शृंगार करायची, त्याचे चुंबन घ्यायची, ती त्याच्यात खोलवर डुंबलेली होती. तुम्ही तिचे पती असता, तर तुम्ही तिच्या भक्तीचे कौतुक केले असते का? नाही. तुमच्याच समस्यांचे तुम्हाला वेड लागले असते. भक्त हे असे असतात. ते आयुष्याच्या तार्किक चौकटीत बसत नाहीत. मी असे म्हणत नाही की, तुमच्यात भक्तीचा पूर्ण अभाव आहे. निश्चितपणे तुमच्यात भावना आहेत म्हणून साहजिकच तुमच्यात थोडीफार भक्ती आहे. पण तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीत राहून अध्यात्माची कास धरायची असल्यास फक्त भक्ती हा एकच मार्ग धरून भागणार नाही, कारण तुम्हाला अजूनही तुमचे आयुष्य तुमच्या इच्छेप्रमाणे घडायला हवे आहे. म्हणून तुम्ही इतर मार्ग शोधायला हवेत. तुमच्या बुद्धीचा वापर करूनसुद्धा तुम्ही परम मुक्ती प्राप्त करू शकता किंवा तुमच्या शारीरिक कर्मांमधून अथवा तुमच्या आंतरिक ऊर्जेला परिवर्तित करून ती मिळवू शकता. प्रत्येक व्यक्ती ही या चार गोष्टींचा संगम असते -शरीर, मन, भावना आणि ऊर्जा. कुणाही व्यक्तीत यापैकी केवळ एकच पैलू असू शकत नाही. 

या चारही पैलूंचा संयोग असल्यास फारच उत्तम. जेणेकरून बाह्य वस्तुस्थितीमध्ये फेरफार न करता तुम्ही तुमची प्रगती करू शकाल. यामध्ये तुमची वाटचाल संथगतीने होईल. तुमचा नवरा, तुमची बायको, तुमचा व्यवसाय, नोकरीधंदा किंवा इतर काहीही असो - यांचे काय होईल याची तुम्हाला पर्वा नसेल, तुम्हाला फक्त आध्यात्मिकदृष्ट्या विकसित व्हायचे असल्यासच भक्ती ही ध्येय गाठण्याचा मार्ग होऊ शकते. हा सगळ्यात जलद मार्गांपैकी एक मार्ग आहे. भक्तीसोबत कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जग, इतर काही असल्यास हे कार्य करू शकणार नाही. भक्ती म्हणजे सर्व काही विरघळून जायला हवे. त्यामुळे तुम्ही भक्तीबद्दल बोलता, तेव्हा बहुधा ती लबाडी असते. एखाद्या क्षणी तुमची अनुभूती एका विशिष्ट स्तरावर पोचते तेव्हा भक्तीचा एक क्षण तुम्ही अनुभवू शकता. त्या क्षणाच्या प्रतीक्षेत राहा. तो अतिशय विलक्षण अनुभव असतो, पण भक्ती एक धोरण म्हणून तिचा पाठपुरावा करू नका कारण त्यात फसवणूक दडलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com