esakal | आरोग्य टिप्स : दिवसभरात स्वतःला द्या वेळ...
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य टिप्स : दिवसभरात स्वतःला द्या वेळ...

आरोग्य टिप्स : दिवसभरात स्वतःला द्या वेळ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
 • तुमच्या व्यग्रतेत स्वतःसाठी कमीत कमी एक तास व्यायामासाठी काढणे आवश्‍यक आहे. नियमित व्यायामाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोज ४० मिनिटे पायी फिरणे व २० मिनिटे योगासने करणे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्‍यक आहे.

 • शरीरातील घड्याळ नियंत्रित ठेवण्यासाठी वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे व वेळेवर जेवणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कुठल्याही प्रकारची व्यसनाधीनता (दारू, तंबाखू, गुटखा) आरोग्यास हानिकारक आहे.

 • आहारात ३० टक्‍के प्रथिने, ३० टक्‍के चरबीयुक्त पदार्थ व ४० टक्‍के कार्बोदके याचा समतोल राखावा. दूध, अंडी, मासे, पनीर, फळे यांचा समावेश आहारात असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 • शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य महत्त्वाचे, हिंसाचार, घृणा, द्वेष, राग, वादविवाद आरोग्यासाठी हानिकारक.

 • एखादा छंद जीवनात जोपासल्यास मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व त्यात सकारात्मक विचारांची भर घालून जीवन सुखकर होऊन आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होते.

 • मोठ्या पावसात शक्‍यतो घराबाहेर पडू नये.

 • मजेखातर पहिल्या पावसात भिजणे वेगळे; परंतु ऐन पावसाळ्यात वारंवार ओले होणे प्रकृतीच्या दृष्टीने घातक आहे.

 • बाहेरून आल्यावर ओले शरीर पुसून कपडे लगेच बदलावेत.

 • ओले झालेले केस व्यवस्थित वाळवावेत. अन्यथा दमट हवेमुळे ते नीट न वाळल्यास उवा किंवा कोंडा होण्याचा संभव असतो. तसेच सर्दी, डोकेदुखीलाही निमंत्रण मिळते.

 • या काळात थंड वारा वाहत असतो. त्यामुळे कानाचे, कपाळाचे रक्षण व्हावे म्हणून डोक्‍यावर स्कार्फ किंवा मफलर बांधावा.

 • पावसाळ्यात रात्री जागरण करू नये. दुपारी झोपू नये.

loading image
go to top