esakal | देवी : एक गतिशील शक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

देवी : एक गतिशील शक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जेव्हा आपण ‘स्त्रीत्त्वा’बद्दल बोलतो, तर ते काही फक्त स्त्री असण्याबद्दल नाही. स्त्री असणे ही एक शारीरिक गोष्ट आहे; स्त्रीतत्त्व हे फक्त शरीरासंबंधी नसून ते त्यापेक्षाही अधिक आहे. ही एक अशी संस्कृती आहे, जिथे स्त्रीतत्त्वाला मोठ्या प्रमाणात सामाजिक महत्त्व देण्यात आले आहे. त्याचवेळेस ही एक अशीही संस्कृती आहे जिने स्त्रीतत्त्वाचे भयंकर शोषणही पाहिले आहे. या संस्कृतीचा मूळ आधार स्त्रीतत्त्वाचा आदर करण्यामध्ये आहे, पण हळूहळू ही संस्कृती स्त्रीतत्त्वाचे शोषण करण्याकडे विकसित होत गेली. स्त्रीतत्त्वाचे वर्णन करणारा मूळ शब्द ‘री’ असा होता. ‘री’ शब्द अस्तित्त्वाची मातृ देवता असा अर्थ सूचित करतो आणि अलीकडच्या काळातील ‘स्त्री’ या शब्दाचे ते मूळ आहे. ‘स्त्री’ शब्दाचा शब्दशः अर्थ एक महिला आहे. ‘री’ म्हणजे चलन, शक्यता किंवा ऊर्जा.

सर्वप्रथम, सृष्टीच्या दृष्टीने, स्त्रीतत्त्व निर्माण कसे झाले? ती कथा अशाप्रकारे आहे. अस्तित्त्वासाठी हानिकारक शक्ती उदयाला आल्या आणि त्यांनी अस्तित्वाला क्षती पोचवायला सुरवात केली जे की अद्याप बाल्यावस्थेत होते. म्हणून तीन मुख्य देवता; ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र आले. हे तीन देव तीन वेगवेगळे गुण दर्शवतात. आज, आधुनिक भौतिक विज्ञानानुसार, हे स्पष्टपणे समजले आहे, की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे अस्तित्वाचे मूळ घटक आहेत. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जागी आहेत आणि ते गतिशील आहेत. त्यांच्यातली गतिशीलता केवळ एका विद्युत ऊर्जेमुळे आहे जी या तिन्ही शक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्या विद्युत आणि विद्युत चुंबकीय शक्तीशिवाय, हे तिघे कोणत्याही गतिमान अवस्थेत राहू शकत नाही. या तिघांच्या गतिशील हालचालींशिवाय, कोणत्याही प्रकारची सृष्टी शक्य नाही. विज्ञानाचा हाच पैलू आहे ज्याचे त्या कथेतून बहुअर्थी पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न होत आहे.

ती कथा हेच सांगते की हे तीन देव एकत्र आले, कारण विध्वंसक शक्ती उदयाला आल्या होत्या आणि त्यांना कसे हाताळायचे हे त्यांना माहीत नव्हते. त्या तिघांमध्ये अतिशय चांगले गुणधर्म होते, पण हे गुणधर्म पुरेसे नाहीत हे त्यांना कळून चुकले होते. यासाठी तिघांच्या एका उत्तम मिश्रणाची गरज होती हे त्यांना समजले होते. म्हणून तिघांनीही जोरदार शक्तीपूर्वक उच्छवास सोडला. त्यांच्यातले जे काही सर्वोत्तम होते ते सर्व त्यातून उत्सर्जित होऊ दिले. हे तिन्ही उच्छ्वास एकमेकांत विलीन झाले आणि ते स्त्रीतत्त्व किंवा देवी बनले. ‘देवी’ शब्द ‘देव’ शब्दापासून आला आहे. ‘देव’ म्हणजे ‘आकाश’. म्हणून देवी म्हणजे एक कण नाही– ती एक अशी व्याप्ती आहे, जी या तिन्ही मूलभूत शक्तींना अस्तित्वात एकत्र धारण करते. ही तीच शक्ती आहे, जिला आपण ‘दे-वी’ म्हणून संबोधतो.

loading image
go to top