इनर इंजिनिअरिंग : जागरूक उपभोगाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनर इंजिनिअरिंग : जागरूक उपभोगाकडे वाटचाल

इनर इंजिनिअरिंग : जागरूक उपभोगाकडे वाटचाल

प्रश्न : भोगवृत्ती (consumerism) ही खरोखरच एक विकृती होत आहे का? लोक सहा-सहा साड्या विकत घेतात, कारण त्यांना अशी भीती वाटते की त्या पार्टीला गेल्या, तर आणखी कोणीतरी तशीच साडी नेसून येईल. इतरांनी नवा मोबाईल फोन घेतला म्हणून लोक नवीन मोबाईल फोन घेतात. मी बालवयात असताना कोणी मला जेवणाव्यतिरिक्त सप्लिमेन्टस देत नसत, पण आज आपण आपल्या मुलांना सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ घालतो.

सद्‌गुरू : याला तुम्ही भोगवाद म्हणा किंवा आणखी काही, हे सर्व प्रकारचे ‘वाद’ आपल्याला वेडे करून सोडणारे आहेत. बेभान भोगवादामुळे मानवतेचे कल्याण नक्कीच होणार नाही. पूर्वी कंझम्पशन हा एक आजार मानला जात असे, तुम्हाला माहितीये? अगदी आजसुद्धा हा एक प्रकारचा आजारच आहे. तो म्हणजे, आपण आपल्या गरजेच्या गोष्टी करत नाही; आपण इतरांच्या अपेक्षेनुसार गोष्टी करतो. ज्या लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात त्यांना त्यांच्याच आयुष्याचीच काही खबर नसते. तुम्ही जर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुमचं आयुष्य घालवले, तर साहजिकच तुमच्या आयुष्याची वाट लागेल.

निरंकुश मन म्हणजे सतत काहीतरी करत बसणे. एकदा जर का मन अशा स्थितीत गेले, की मग समाज दुष्ट चक्रात अडकून, गोलगोल फिरत राहतो, तो पुढे वाटचाल करू शकत नाही. प्रगल्भ, अपूर्व असे काहीही त्या समाजात घडणार नाही. सर्व काही भ्रष्ट होऊन जाईल. आज, आपण त्याच दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. भारत भूमी ही एक अशी संस्कृती होती जिथे आयुष्याचा प्रत्येक घटक, प्रत्येक पैलू सखोलपणे रुजलेले आणि अर्थपूर्ण आणि सुसंगत होते. अगदी सोप्या गोष्टी – कसे बसावे, कसे उठावे, जेवण कसे करावे – या प्रत्येक गोष्टी जीवनाशी अगदी सुसंगत आणि अर्थपूर्ण होत्या. म्हणून, बाहेरून कितीही आक्रमणे, दुष्काळ, दारिद्र्य किंवा इतर कोणत्याही बाह्य अडचणींना सामोरे जावे लागले, तरी भारत भूमीची मूलभूत चेतना डगमगली, हरपली नाही.

आपल्या लोकांमध्ये संस्कृतीचे खोलवर रुजलेले हे मूळ उखडून काढले आणि त्यांना आजच्या मॉलसंस्कृती जगू दिले, तर ते अगदी सहजगत्या छिन्नविछिन्न होऊन विखरून जातील. जवळपास २० वर्षांपूर्वीपर्यंत, मानसिक आजाराने ग्रस्त लोकांची संख्या खूपच कमी होती. ही संख्या कमी होती याचे कारण योग्य नोंदी ठेवल्या गेल्या नसाव्यात असे असू शकते, जे खरे आहे, पण तरीसुद्धा कोट्यवधी लोकसंख्येच्या या देशात, मानसिक विकारांनी त्रस्त लोकांची संख्या लक्षणीयरित्या कमी होती याचे कारण आपल्या संस्कृतीतील नित्यनियमाच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत गहन अर्थ आणि एक सखोल शक्यता होती. तुम्ही अमेरिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नैराश्यातून बरे होण्यासाठी औषधे घेणाऱ्या या लोकांचे प्रमाण पाहिले, तर हे लक्षात येते की तो समाज निरोगी नाही, जो अनेक अर्थांनी बेभान भोगवादाचा परिणाम आहे.

माझ्या मते अधिक संवेदनशील मार्गाने जगणे सहज शक्य आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद लुटू नये, किंवा तुम्ही कोणत्याही सुख-सुविधांचा उपभोग घेऊ नये. प्रत्येकाकडे त्याच्या गरजेपुरते सर्वकाही असायलाच हवे. पण केवळ इतर कोणाच्या अपेक्षेनुसार जगण्यासाठी या पृथ्वीचे लचके तोडणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. मी काही कोणताही पर्यावरण बचाव संदेश देण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला मनुष्यांची चिंता आहे. कारण असे करणे म्हणजे त्या लोककथेत सांगितल्याप्रमाणे, स्वतःच बसलेली फांदी तोडत असलेल्या माणसासारखे आहे. फांदी तोडण्यात तो यशस्वी झाला, तर तोदेखील खाली पडेल.

Web Title: Inner Engineering Moving Towards Conscious Consumption Sadguru Isha Foundation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Engineering
go to top