video :  शून्य म्हणजे.....

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सर्वांत मोठी संख्या हवी असेल तर तुम्ही १, २, ३, ४, ५ यांची बेरीज करता की ० लावता? शून्य म्हणजे काहीही नाही, पण नाही तेच एखाद्या संख्येला अनंत बनवते.

इनर इंजिनिअरिंग
आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे नेहमीच एकतर शून्य बनणे किंवा अनंत होणे.  तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा, पण हे दोन वेगळे मार्ग नाहीत. जे काही आहे ते नेहमीच मर्यादित आहे, पण नाही; ते मात्र अनंत आहे. मग नाही आणि अनंत या दोन्ही गोष्टी समान कशा असू शकतात? सर्वांत मोठी संख्या हवी असेल तर तुम्ही १, २, ३, ४, ५ यांची बेरीज करता की ० लावता? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शून्य म्हणजे काहीही नाही, पण नाही तेच एखाद्या संख्येला अनंत बनवते. गणित शास्त्रात सर्वांत अविश्वसनीय गोष्ट म्हणजे शून्य आणि हे काही अपघाताने घडलेले नाही. ते एका निश्चित अशा साक्षात्कारातून जाणले गेलेय. लोकांनी आपल्या अंतरंगात डोकावून पाहिले आणि अनंताच्या पोकळीत उडी घेतली, तेव्हा शून्याचा आविष्कार झाला. म्हणून शून्याचा शोध पूर्वेकडील देशात लागला हे अपघाताने घडलेले नाही, कारण हे त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या प्रयत्नांचे सार आहे. योगविज्ञान हे आपल्याला शून्य करण्याचे तंत्रज्ञान आहे. कारण शून्य ही साधी गोष्ट नाही. शून्य अनंत आहे. सर्वांचा मुळारंभ शून्य आहे. ही एक संख्यारहित अवस्था आहे. ही मौनाची अवस्था आहे. मौन हरवले कारण संख्या उपस्थित झाल्या. शरीर एकच आहे, पण त्यातून दोन हात बाहेर आले आहेत. पृथ्वी एकच आहे, पण तिच्यातून पुष्कळ लोक बाहेर आलेले आहेत. अस्तित्व एकच आहे, पण त्यातून अगणित विश्व उत्पन्न झाली आहेत. जगातील सर्व आध्यात्मिक संस्कृती अनंत होण्याची इच्छा बाळगून आहेत; कारण त्यांनी पाहिले की निसर्गाचासुद्धा हाच हेतू आहे. ते सृष्टीचा आणि निसर्गाच्या हेतूच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांना कळले की अनंत ही फक्त एक कल्पना आहे. वास्तविक गोष्ट म्हणजे शून्य. म्हणून त्यांनी पोकळीबद्दल बोलायला सुरुवात केली - शून्य, निर्वाण, निर्विकल्प वगैरे.  

 

मनाचा स्वभाव
मनाचा स्वभाव नेहमीच साठवण्याचा असतो. ते स्थूल अवस्थेत असते तेव्हा त्याला वस्तू साठवायच्या असतात. ते थोडे विकसित होते, तेव्हा त्याला ज्ञान साठवायचे असते. भावना प्रबळ होतात, त्याला लोकांना संग्रहित करायचे असते, पण त्याचा मूलभूत स्वभाव म्हणजे साठवणे.  एखादी व्यक्ती ती आध्यात्मिक मार्गावर असल्याचा विचार करू लागते, तेव्हा तिचे मन आध्यात्मिक ज्ञान गोळा करू लागते. पण अन्न असो, वस्तू असोत, लोक किंवा ज्ञान - तुम्ही काय साठवता याला महत्त्व नाही, जिथे साठवण्याची गरज आहे, याचा अर्थ तिथे अपूर्णता आहे. अपूर्णत्वाचा हा भाव तुमच्यात शिरला आहे; कारण  तुम्ही नाहीत अशा मर्यादित गोष्टींशी तुमची ओळख बांधली. तुम्ही पुरेशी जागरूकता बाणवलीत आणि सर्वांत महत्त्वाचे सतत साधना करत राहिलात, हळूहळू तुमचे पात्र पूर्णपणे रिक्त होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isha Foundation article