

The Power of Laughter in Cancer Treatment
Sakal
आशा नेगी
(लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत)
कर्करोग... नाव ऐकलं की अनेकांच्या मनात भीती घर करते. उपचारांची वेदना, अनिश्चित भविष्य आणि सततची मानसिक घालमेल ही सगळी एकत्रितपणे रुग्णाला थकवत असते; पण या भीतीच्या काळोखातही एक असं तेजस्वी औषध आहे जे खर्चीक नाही, उपलब्धतेचा प्रश्न नाही, दुष्परिणाम नाही...ते म्हणजे हास्य. हो, अनेक वेळा शरीराला देण्यात येणाऱ्या केमोइतकंच मनाला देण्यात येणारं हास्य आणि सकारात्मकता प्रभावी ठरते.