

Understanding Osteoarthritis Beyond Wear and Tear
Sakal
डॉ. मृदुल देशपांडे
आहारमंत्र
गुडघेदुखी, मानखांदा-कंबर दुखणे किंवा जिने चढताना त्रास या सर्वांच्या मागे साधारणपणे एकच कारण सांगितले जाते : ‘‘वय वाढलंय, म्हणून सांधे झिजलेत. म्हणजे wear and tear!’’; पण हे पूर्ण सत्य नाही. फंक्शनल मेडिसिनचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे, ऑस्टिओआर्थ्रायटिस (OA) ही फक्त झीज नाही, तर शरीरातील अंतर्गत सूज, जीवनशैली आणि मेटाबॉलिक असंतुलन यांचा एकत्रित परिणाम आहे.