योगा लाइफस्टाइल : तदा द्रष्टु: स्वरुपेऽवस्थानम् | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगा लाइफस्टाइल : तदा द्रष्टु: स्वरुपेऽवस्थानम्

योगा लाइफस्टाइल : तदा द्रष्टु: स्वरुपेऽवस्थानम्

तद ः नंतर, त्या वेळी

द्रष्टु ः आत्मा, सिद्ध पुरुष

स्वरूप ः स्वतःच्या रूपात

अवस्थाम ः वसणे, वस्ती करणे

गेल्या भागात आपण चित्त स्थिर होणे म्हणजे काय, याची माहिती घेतली. चित्त स्थिर झाल्यावर काय होते याचे स्पष्टीकरण त्या सूत्रातून आपल्याला लक्षात आले असेलच. तुम्ही जागतेपणीही मनःशांतीची अनुभूती घेऊ शकता. चित्त स्थिर राहिल्यावर तुमची आत्मिक शांती सुयोग्य पद्धतीने राहते. एक लक्षात घ्या, कोणतेही भावनिक चढउतार, विकृती नसते तेव्हा तुमचा आत्मा आनंदाच्या स्थितीत असतो आणि तेच त्याचे खरे स्वरूप आहे. आपण अन्य कोणत्याही गोष्टींशी भावनिक नाते जोडतो, कोणाची काळजी हा आपला मूळ स्वभाव नसल्यास हे भावनिक चढउतार आपल्याला खऱ्या आणि शुद्ध आनंदाच्या स्थितीची अनुभूती घेण्यापासून दूर ठेवतात.

तुमच्या चित्ताच्या लहरी म्हणजे चेतना शांत किंवा स्थिर असताना ते तुमच्या आत्म्याचे खरे प्रकटीकरण रोखू शकत नाही. चित्तवत्तींना सहज प्रकट करू शकल्यासच आपल्याला स्वतःची ओळख मिळते. आपल्या मनावर तीन गुणांचा आणि बदलणाऱ्या मूडचा परिणाम होत नाही व त्याचबरोबर आपली भौतिक जगाबरोबर असलेली ओळख पुसली जात नाही, तोपर्यंत आपले घर, कार, बँक बॅलन्स, जोडीदाराचे आपल्यावरील प्रेम, मुलांचे यश, पालकांचे वर्तन आणि कामाच्या ठिकाणी असलेला हुद्दा या सर्वांचा विचार करणे तुम्ही सोडू शकत नाही. आपल्या मर्यादित आकलनामुळे कैवल्य म्हणजे काय, हे आपण समजून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर आत्मसाक्षात्काराची स्थिती आणि समाधी अवस्थेत उलगडणाऱ्या चैतन्याचा परमोच्च क्षणही समजून घेता येत नाही.

आपण नेहमीच्या अवस्थेत असताना आपल्या आवडी-निवडी, नापसंती, इच्छा-आकांक्षा, खोट्या समजुती, भ्रामक विचारसरणी यांपासून आपण अलिप्त राहू शकतो, त्यावेळी आपला आत्मा आनंदाच्या खऱ्या स्थितीत राहतो. कैवल्य किंवा आत्मसाक्षात्काराच्या ध्येयापर्यंत पोचण्यास सक्षम होण्यासाठी मनाची शुद्धता, इंद्रिंयावरील, इच्छांवरील पूर्ण नियंत्रण या गोष्टी अनिवार्य आहेत. अवस्थानम् या शब्दाचा अर्थ मूळ स्थितीत आणणे असा आहे आणि याची चर्चा आपण चौथ्या अध्यायात (भागात) करूयात.

Web Title: Yoga Lifestyle Tada Drstu Swarupetravasthanam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :yogaLife
go to top